मैत्री फाउंडेशन ने उभारली आनंदाची गुढी!
मैत्री फाउंडेशनच्या वतीने आनंदाची गुढी
आदिवासी कुटुंबांना धान्य वाटप
कासा, ता. २१ (बातमीदार) : गुढीपाडव्याच्या निमित्ताने बोरवलीच्या मैत्री फाउंडेशनचे संस्थापक राजेश त्रिवेदी यांनी जुचंद्र येथील शिव छत्रपती समाज सेवा मंडळाच्या सहकार्याने विक्रमगड व डहाणू तालुक्याच्या दुर्गम भागातील एक हजार आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
मैत्री फाउंडेशनचे विश्वस्त संगाती त्रिवेदी, व्रज त्रिवेदी व ऋत्वी जैन यांच्या हस्ते विक्रमगड तालुक्यातील कासपाडा, अलीवपाडा, कलमपाडा, पाटीलपाटा, डोयापाडा, पासोडीपाडा, तळ्याचा पाडा तसेच डहाणू तालुक्यातील कांदरवाडी, शहाणपाडा, पाटीलपाडा, कोमपाडा, डोंगरीपाडा येथील एकूण एक हजार आदिवासी कुटुंबांना तांदूळ, आटा, मूगडाळ, तूरडाळ, तेल, मसाला, हळद, साखर, चहापावडर, चणाडाळ, साबण इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. जूचंद्र सेवा मंडळाचे अध्यक्ष किरण म्हात्रे यांनी मैत्री फाउंडेशनचे आभार मानले. कार्यक्रमास जूचंद्र सेवा मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील, समर्थ केटरचे वारंगडे उपस्थित होते. मैत्री फाउंडेशनचे सेवक पियुष पटेल, अंगणवाडी सेविका, जूचंद्र सेवा मंडळाचे मिलिंद पाटील, धर्माजी म्हात्रे, लक्ष्मण भोये, सिताराम भोये, अनिल असारे यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

