पुढील काळात प्रत्येक तालुक्यात प्रदर्शनासाठी प्रयत्न - ना. अदिती तटकरे
प्रत्येक तालुक्यात प्रदर्शनासाठी प्रयत्न ः आदिती तटकरे
मिनी सरस व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) ः जिल्ह्यात यंदा प्रथमच सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन केवळ विक्रीसाठी नाही, तर यातून केंद्र सरकारच्या लखपती दीदीची माहितीही देण्यात येणार आहे. यावर्षी २५ लाख महिला लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बचत गटांचा उत्साह पाहून आनंद झाला. पुढील काळात बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रदर्शन भरतील असे काम करूया, असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २०) आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होत्या. या वेळी अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, गटनेते वैकुंठ पाटील, संतोष बैलमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, कार्यकारी अभियंता विनायक तेलंग, महिला व बालकल्याण समिती अधिकारी निर्मला कुचिक, शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांच्यासह कर्मचारी व महिला उपस्थित होत्या.
अर्थसंकल्पात बचत गटासाठी मोठी तरतूद करणार
मंगेश वाकडीकर यांनी, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद अर्थसंकल्पात महिला बचत गटासाठी मोठी तरतूद केली जाईल, असे सांगितले. तर उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी राज्य शासनाच्या महिलांसाठी राबविलेल्या योजनांमुळे, सहाय्यामुळे महिला बचतगटांना आर्थिक सक्षमीकरणाठी मदत होत आहे. पुढील वाटचालीसाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य असणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्ह्यात १९,५६५ महिला स्वयंसहाय्यता गट
प्रास्ताविकामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी, जिल्ह्यात १९,५६५ महिला स्वयंसहाय्यता गट असून, फिरते कर्ज, बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दोन कोटी ८९ लाख रुपये निधी वितरित केला आहे. तसेच, उमेद ॲपवर १०० बचत गटांची नोंदणी करण्यात आली आहे. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी बनवलेली नावीन्यपूर्ण उत्पादने एकाच छताखाली मिळणार आहेत. यासोबतच २४ मार्चपर्यंत विविध खाद्यपदार्थ व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

