

वरोतीमध्ये ईद उत्साहात साजरी
कासा, ता. २१ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील वरोती येथील जामा मशिदीत ईदनिमित्त शनिवारी (ता. २१) मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली. या वेळी कासा, चारोटी, सूर्यानगर परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईदच्या पार्श्वभूमीवर मशिद परिसरात आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले. नमाजानंतर उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश दिला. दरम्यान, कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी अमर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मशिदीत भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सुरक्षा व्यवस्थेची पाहणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी मशिदीचे मौलवी, ट्रस्ट कमिटीचे सदस्य तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.