गॅस बुकिंगच्या नावाखाली सायबर फसवणूक; चेंबूर पोलिसांची जनजागृती
गॅस बुकिंगच्या नावाखाली सायबर फसवणूक; चेंबूर पोलिसांची जनजागृती
चेंबूर, ता. २१ (बातमीदार) : मुंबई शहर व उपनगरांत गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांना सतर्क करण्यासाठी चेंबूर पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधन टंचाई निर्माण झाल्याने घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. यामुळे अनेक ठिकाणी गॅस वितरण प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या असून, वितरण केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. काही हॉटेल व लहान स्टॉलही बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
या परिस्थितीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून गॅस बुकिंग व केवायसीच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. ‘गॅस बुकिंग कन्फर्म करा’ किंवा ‘सिलिंडर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करा’ अशा आशयाचे बनावट एसएमएस व ओटीपी पाठवून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. अशा लिंकवर क्लिक केल्याने अनेकांना आर्थिक फटका बसल्याचे निदर्शनास आले आहे.
ही फसवणूक टाळण्यासाठी चेंबूर पोलिस ठाण्याच्या वतीने सुभाषनगर, सिद्धार्थ कॉलनी, बसंत पार्क, लाल डोंगर, चेंबूर नाका अशा परिसरांत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवले यांच्या पुढाकाराने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता दक्ष राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या सूचना
अनोळखी लिंक किंवा ओटीपीवर क्लिक करू नये, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, फक्त अधिकृत गॅस एजन्सी किंवा ॲपद्वारेच बुकिंग करावे, संशयास्पद संदेश मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

