जोगेश्वरी पूर्वेत सर्वोदय नगर बसथांबा अडचणीत
जोगेश्वरी पूर्वेत सर्वोदय नगर बस थांबा अडचणीत; प्रवाशांचे हाल, आधुनिक थांब्याची मागणी
मुंबई, ता. २१ : जोगेश्वरी पूर्व येथील सर्वोदय नगर मार्गावरील बस थांबा गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत सापडला असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हेमा इंडस्ट्री परिसर तसेच सृष्टी इमारतीसमोरील हा बसथांबा रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे पूर्णपणे वेढला गेला आहे.
सध्या बस थांब्याभोवती हिरव्या कापडाचे कुंपण व बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे हा थांबा प्रत्यक्षात वापरता येत नसून, या मार्गावरील बससेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी प्रवाशांना पर्यायी व्यवस्था नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय फुटपाथवर झाडांच्या कुंड्या, नारळाच्या झाडांच्या झावळ्या तसेच अनधिकृत फेरीवाल्यांच्या गाड्यांमुळे संपूर्ण पदपथ अडथळ्यांनी व्यापला गेला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, अडथळ्यांमुळे बसथांबा सहज दिसून येत नसल्याने नवीन प्रवाशांना तो शोधण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून येथे स्वच्छ, सुरक्षित व आधुनिक बसथांबा उभारावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

