स्वामीभक्तीत राजकारण आणू नका

स्वामीभक्तीत राजकारण आणू नका

Published on

स्वामीभक्तीत राजकारण आणू नका ः मनोज प्रधान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : अहमदाबादहून येताना स्वामी समर्थांनी ज्या वटवृक्षाखाली विश्रांती घेतली होती. तिथेच उभारलेल्या मठावर कारवाई करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा दावा स्वामी समर्थ मठाच्या विश्वस्तांनी केला. तर, स्वामी भक्तीत राजकारण आणू नका; स्वामींची लाठी पडली तर महाग पडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला.
आनंद नगर येथे म्हाडाच्या भूखंडावर स्वामी समर्थांचा मठ उभारलेला आहे. १९ वर्षांपासून या मठात स्वामीभक्तांचा वावर आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून हा मठ जमीनदोस्त करून तेथे उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात १० नोव्हेंबर २०२५ रोजी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली स्वामीभक्तांनी पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. यानंतर आयुक्त आणि स्वामी भक्तांमध्ये झालेल्या चर्चेत कारवाईला स्थगिती देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नवीन नोटीस बजाविण्यात आली नसली तरी मठ तोडून उद्यान बनविण्याच्या हालचाली अद्यपही सुरू आहेत. शनिवारी (ता. २१) मनोज प्रधान हे दर्शनासाठी गेले असता, मठाच्या विश्वस्तांनी त्यांना माहिती दिली. त्यानंतर प्रधान यांनी मठातच पत्रकारांशी संवाद साधताना, आम्ही केलेल्या आंदोलनानंतर पालिकेकडून नवीन नोटीस आलेली नाही. सात दिवसापूर्वी येथील फलक फाडण्यात आला. हिंदूत्वावर मते मागणारेच मठ पाडायला येत आहेत. त्यांना स्वामींची लाठी पडणारच आहे, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com