चांधई येथे ‘भावी आमदार व सरपंच चषक’ क्रिकेट स्पर्धा उत्साहात
चांधई येथे ‘भावी आमदार व सरपंच चषक’ क्रिकेट स्पर्धा उत्साहात
कर्जत, ता. २१ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील महत्त्वाची मानली जाणारी वार्षिक क्रिकेट स्पर्धा यंदाही चांधई येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यावर्षी या स्पर्धेला ‘भावी आमदार व सरपंच चषक’ असे नामकरण करण्यात आले होते.
आर. के. कोळंबे आणि जे. के. कोळंबे या दोघा भावांच्या पुढाकारातून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. श्री ११ क्रिकेट संघ, चांधई यांनी यंदा स्पर्धेचे नियोजन यशस्वीरीत्या पार पाडले. क्रीडा क्षेत्रातील उद्योजक राम कोळंबे, जनार्दन कोळंबे तसेच सरपंच जयवंती कोळंबे यांच्या सहकार्यामुळे स्पर्धेला भक्कम पाठबळ मिळाले. या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदवला.
चार दिवस चाललेल्या या नाईट क्रिकेट स्पर्धेला कर्जत तालुक्याचा ‘विश्वकप’ म्हणून खेळाडूंमध्ये विशेष मान आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी उपस्थित राहून खेळाडू आणि आयोजकांचे कौतुक केले.
बुधवारी (ता.१८) झालेल्या अंतिम सामन्याने स्पर्धेची सांगता झाली. अंतिम फेरीत ‘चेंज द गेम’ (वंजारपाडा) संघाने विजेतेपद पटकावले, तर ‘रुहान ११’ (स्व. दि. बा. पाटील प्रतिष्ठान, उमरोली) संघ उपविजेता ठरला. ‘श्रीपती बाबा’ (उमरोली) संघाने तृतीय, तर ‘अनुष्का ११ जय भवानी’ (वावलोली) संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये कल्पेश कांबेरे (वावलोली) यांना ‘बेस्ट बॉलर’, करण बाबरे (वंजारपाडा) यांना ‘बेस्ट बॅट्समन’, तर आकाश गायकर (उमरोली) यांना ‘मालिकावीर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पर्धेदरम्यान संदीप बोराडे, अजय डायरे आणि समीर सोमणे यांनी समालोचन करत वातावरण रंगतदार ठेवले. चारही दिवस सामने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

