कल्याण-डोंबिवलीत स्वामी भक्तांची मांदियाळी

कल्याण-डोंबिवलीत स्वामी भक्तांची मांदियाळी

Published on

कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’च्या जयघोषात कल्याण-डोंबिवली शहर परिसरात श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मठ व सेवा केंद्रांमध्ये धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी श्रद्धेने सहभाग नोंदवला.
कल्याण पारनाका येथील सेवा केंद्रात बालविकास कार्यशाळा, हितगुज, पारायण; तसेच सामूहिक ‘स्वामीचरित्र सारामृत’ पठण करून अभिषेक करण्यात आला. याचबरोबर पारनाका केंद्राच्या स्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाल्याने तिसरा वर्धापनदिनही साजरा करण्यात आला. शहरातील पारनाका, बिर्ला कॉलेज रोडलगत असलेले श्री स्वामी समर्थ चौकातील केंद्र, भवानीनगर येथील मठ, खडकपाडा, रामबाग, काळातलाव, गोदरेज हिल तसेच कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी, गणेश नगर आदी ठिकाणी भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. कल्याण पश्चिमेतील फॉरेस्ट कॉलनी येथे सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने पालखी सोहळा पार पडला.
पारनाका केंद्रात सेवेकरी स्वाती पाचघरे यांनी बालसंस्कार वर्ग, ‘श्री स्वामी चरित्र सारामृत’ पठण, ‘श्री गुरुचरित्र’ व ‘श्री नवनाथ’ पारायण यांसारख्या विविध अध्यात्मिक उपक्रमांची माहिती दिली. यावर्षी २१ व २२ मार्चला सूर्या रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com