महापौर, उपमहापौरांना मिळणार नवी वाहने
वाशी, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेतील महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांना लवकरच नवीन वाहने मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सध्या या पदाधिकाऱ्यांना पालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतलेली जुनी वाहने देण्यात आली आहेत; मात्र आता पालिकेकडूनच नवीन वाहने खरेदी करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शुक्रवारी (ता. २०) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, की येत्या आठ दिवसांत नवीन वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
सर्वसाधारण सभेत नगरसेवक सूरज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. नवी मुंबई महापालिकेच्या मालकीची वाहने सरकारच्या विविध विभागांना देण्यात आली आहेत का? तसेच, पालिकेची मालमत्ता सरकारकडे कोणत्या नियमांनुसार देण्यात आली, याबाबतही त्यांनी स्पष्टता मागितली. यावर उत्तर देताना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले, की सरकारच्या सूचनेनुसार तसा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले; मात्र पालिकेकडून देण्यात आलेली वाहने आता पुन्हा परत मागवण्यात आली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांना नवीन वाहने देण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

