चिरनेर येथे पशूसंवर्धन विभागाचा मेळावा

चिरनेर येथे पशूसंवर्धन विभागाचा मेळावा

Published on

उरण, ता. २१ (बातमीदार) : उरण तालुका पशुसंवर्धन विभागातर्फे चिरनेर येथे माहिती, प्रशिक्षण व जनसंपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चिरनेर ग्रामपंचायत सभागृहात आयोजित या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात पशु-पक्षी पालक, तसेच शेतकरीबांधव उपस्थित होते.

विविध शासकीय योजना राबवून पशू, पक्षी संवर्धनास चालना मिळण्यासाठी अस्कॅड योजनेंतर्गत विविध योजनांची माहिती शेतकरीवर्गास मिळावी, म्हणून उरण तालुका पशुसंवर्धन विभागातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पशुपालनामध्ये येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना, तसेच गाई, म्हशी, शेळीपालन करताना त्यांचे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कोणते खाद्य, तसेच औषधे द्यावीत, गाई, म्हशींचे व्यंधत्व निवारण, त्याचबरोबर गोठ्याचे व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ भोजने व उरण तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय सहाय्यक आयुक्त अमोद थेवूरकर यांनी दिली. या वेळी विविध शासकीय योजना कशा राबवायच्या, याची माहिती उपस्थितांना देताना शेतकऱ्यांच्या शंकांचेही निरसन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com