पाम बीच हिट-अँड-रन प्रकरण
१६ दिवसांच्या झुंजीनंतर जखमी हरमनचाही मृत्यू
पाम बीच हिट अँड रन प्रकरण
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : नवी मुंबईतील पाम बीच रोडवरील हिट अँड रन अपघातात जखमी झालेल्या १७ वर्षीय हरमन कौरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत आधीच एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रकरणातील मृतांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे.
सानपाडा येथील पाम बीच रोडवर मंगळवारी (ता. ३) पहाटे घडलेल्या भीषण हिट अँड रन अपघातात गंभीर जखमी झालेल्या १७ वर्षीय हरमन कौर हिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात गेल्या १६ दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेत उपचार सुरू असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचालक प्रशांत जमदाडे (२३) याचा जागीच मृत्यू झाला होता.
सारसोळे जंक्शन आणि मोराज सर्कलदरम्यान ३ मार्चला पहाटे सुमारे ३ वाजता प्रशांत आणि हरमन हे कोपरखैरणेकडे जात असताना त्यांची दुचाकी घसरली. त्यानंतर काही क्षणांतच मागून येणाऱ्या दोन कारनी त्यांना चिरडले. अपघातानंतर मदत न करता दोन्ही चालक घटनास्थळावरून पसार झाले. सीसीटीव्हीच्या आधारे सानपाडा पोलिसांनी सागर सांडा आणि कृष्णा रावरिया या आरोपींची ओळख पटवली आहे. हरमनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती शुद्धीवर आली नव्हती. तिच्या निधनानंतर कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच दोषारोपपत्र सादर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

