मुंबई अहमदाबाद महामार्गावर २४ तासांत तीन अपघात

मुंबई अहमदाबाद महामार्गावर २४ तासांत तीन अपघात

Published on

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर २४ तासांत तीन अपघात
सातिवली परिसरातील गतिरोधक ठरले धोकादायक

मनोर, ता. २१ (वार्ताहर) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातिवली परिसरातील गतिरोधकांमुळे अवघ्या २४ तासांत तीन अपघात घडले. या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून अखेर प्रशासनाला गतिरोधक हटवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातिवली गावाच्या हद्दीतील वांद्री नदीवरील पुलाजवळ अवघ्या २४ तासांत तीन अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. यातील दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. या परिसरातील गतिरोधक अपघात आणि वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याचा आरोप वाहनचालक आणि प्रवाशांकडून करण्यात आला आहे.

शनिवारी (ता. २१) सकाळी ७.३०च्या सुमारास सातिवली उड्डाणपुलाच्या उतारावर एक अपघात झाला. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे असलेल्या कारला पाठीमागून धडक दिली. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वांद्री नदीवरील पुलावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामादरम्यान ठेकेदाराने मुंबई आणि गुजरात या दोन्ही वाहिन्यांवर गतिरोधक बनवले होते; मात्र हे गतिरोधकच अपघातांचे कारण ठरत असल्याचे स्पष्ट झाले.

संतापानंतर गतिरोधक हटवले
गतिरोधक उभारल्यानंतर अवघ्या २४ तासांत तीन ते चार अपघात घडले. तसेच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या कारभारावर वाहनचालकांकडून तीव्र टीका करण्यात आली.

या निर्णयामुळे परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी तातडीने जेसीबीच्या साहाय्याने संबंधित गतिरोधक हटवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com