ज्येष्ठांच्या प्रतिक्रीया
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिकि्रिया
मी पत्नी मृदुला आणि मुलगा जयदीप यांच्यासाेबत श्रीगुरू पादुका दर्शन साेहळ्याचा आनंद घेतला. एकाच ठिकाणी इतक्या संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा अनुभव विलक्षण आणि अत्यंत भावनिक हाेता. या ठिकाणी मिळालेला शांतता आणि समाधानाचा अनुभव कायम स्मरणात राहील.
- दिलीप सप्तश्री, खार
----
पत्नीसमवेत संत-महंतांच्या पादुकांचे दर्शन आमच्यासाठी परमसुखाची अनुभूती ठरली. इतक्या संतांच्या पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी हाेणे ही फार दुर्मिळ बाब आहे. या ठिकाणाहून संतांचा आशीर्वाद घेऊन जाताना मनाला समाधान वाटत आहे. खरेच ही भक्तीत न्हाऊन निघालेल्या क्षणाची शिदाेरी कायम आमच्यासाेबत राहील.
- विष्णू पाटील, उल्हासनगर
----
संतांच्या पादुकांचे एकाच वेळी दर्शन ही संकल्पना खूप छान आहे. नियोजनही अतिशय सुंदर केले आहे. येथे आल्यावर खूप खूप प्रसन्न वाटले. मुंबईत झालेला हा दुसरा साेहळा आहे. जाेपर्यंत श्वास आहे, ताेपर्यंत या साेहळ्यात सहभागी हाेणार आणि पुन्हा पुन्हा हा आध्यात्मिक अनुभव आम्ही घेणार आहाेत.
- दिनेश वैद्य/दीपिका वैद्य (कांदिवली)
----
२१ संतांच्या पादुकांचे दर्शन हा खरोखरच आयुष्यातील अविस्मरणीय आणि आध्यात्मिक समाधान देणारा क्षण आहे. वयाच्या ऐंशीव्या वर्षातील हा अनुभव कधीच विसरता येणार नाही. या दर्शनामुळे मन प्रसन्न झाले. आत्म्याला शांती लाभली आणि आयुष्य धन्य झाल्याची भावना आहे.
- इंदू हळवे, वाशी
----
वय झाल्याने चालता येत नाही. त्यामुळे तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेणे शक्य नव्हते; पण श्रीगुरू पादुका दर्शन साेहळ्यामुळे एकाच छताखाली २१ संतांच्या पादुकांचे दर्शन झाले. हे आमचे मोठे भाग्यच आहे. येथील मंगलमय वातावरण पाहून मन तृप्त झाले.
- ऊर्मिला साळवी, परळ
----
शेताच्या बांधावर काम करत असताना माझा पाय फ्रॅक्चर झाला; पण श्रद्धा आणि इच्छेमुळे मी आज येथे आले. येथील वातावरणामुळे माझे दुखणे कुठच्या कुठे पळाले. व्हीलचेअरची सुविधा असल्यामुळे दर्शन घेणे सोपे झाले. आमचे कुटुंब तीन वर्षे या सोहळ्याला येत आहोत. येथे येऊन आध्यात्मिक सुख अनुभवले.
- सुनंदा अरविंद गायकवाड, बादे, खंडाळा
------
माझ्या मुलासाेबत श्रीगुरू पादुका दर्शन साेहळ्याला आलाे हाेताे. दाेन्ही पायांनी दिव्यांग असल्यामुळे व्हीलचेअरवर बसून सर्व संतांचे दर्शन घेतले. येथे येऊन नवीन ऊर्जा मिळाली.
गेल्या वर्षी येता आले नव्हते. यावर्षी हा याेग जुळून आल्याने मी स्वतःला नशिबवान समजताे.
- प्रवीण राऊत, दादर
----
गतवर्षी मनात खूप इच्छा असतानाही या भव्यदिव्य साेहळ्याचा अनुभव घेता आला नव्हता. यावर्षी काेणत्याही परिस्थितीत या साेहळ्याला यायचेच, असा निर्धार केला हाेता. माझी ही इच्छा पूर्ण झाल्याने वेगळेच समाधान वाटत आहे. व्हीलचेअरवरून सर्व पादुकांचे दर्शन घेतले.
- विमल सांगळे, नाशिक
------
संत आणि सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेऊन आत्मिक समाधान मिळाले. मन:शांतीचा अनुभव घेतला. या संपूर्ण साेहळ्याचे आयाेजन चाेख करण्यात आले आहे.
- सुशीला मारुती अडांगले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

