राजकीय प्रतिक्रिया

राजकीय प्रतिक्रिया

Published on

माझ्यासह राज्यातील अनेक नागरिक या श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतो. एकाचवेळी एकाच छताखाली २१ संत-सद्‍गुरूंच्या पादुकांचे एकाच ठिकाणी दर्शन होणे भाग्याचे आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी दिलेली शिकवण, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन येथून जात आहे. मुंबईकरांनी रविवारीही न चुकता दर्शनासाठी यावे.
- मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकासमंत्री
----
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दर्शन उत्सवाला येथे आलो. विविध संत-सद्‍गुरूंच्या पादुकांच्या दर्शनाने आजचा दिवस सत्कर्मी लागला. संत, सद्‍गुरूंचे विचार तरुण पिढीला कळायला हवेत. तरुणांनी किमान एखाद्या संतांचा बोध घेतला, तरी त्यांचे जीवन पावन होईल.
- सचिन अहिर, आमदार, विधान परिषद
---
मुंबईत एकाच छताखाली सर्व संत-सद्‍गुरू पादुकांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध केली, त्याबद्दल ‘सकाळ माध्यम समूहा’चे मनापासून धन्यवाद. इथे आल्यावर मनाला वेगळीच आध्यात्मिक शांतता, समाधान मिळाले.
- आशीष चेंबूरकर, माजी अध्यक्ष, बेस्ट समिती
-----
लोकांना साधू-संतांच्या दर्शनाला जाता येत नाही; पण ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या या पादुका सोहळ्यात दर्शन घडत आहे. सर्व साधू-संतांच्या पादुकांचे एकाच ठिकाणी दर्शन झाल्याने आम्ही धन्य झालो.
- उमेश अणेराव, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ
----
आपली परंपरा, संस्कृती जतन करण्याचे महान कार्य यानिमित्ताने केले जात आहे. लहान मुलांना संस्कृतीचे दर्शन घडले. पादुका दर्शन अविस्मरणीय क्षण आहे. धकाधकीच्या जीवनात मनःशांती मिळाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
- ॲड. श्वेता काळे, नगरसेविका, नवी मुंबई
- ---
एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याचा मला योग आला. जगद्‍गुरू तुकोबाराय, संत ज्ञानेश्वरांच्या विचाराने काम केल्यास परमेश्वर नक्कीच तुमच्या भेटीसाठी येतो. मनुष्याला चांगल्या मार्गाने कसे जगता येईल, याविषयी चांगले विचार ऐकता आले.
- नीलेश सांबरे, शिवसेना उपनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com