एमजीएम रुग्णालयातून दागिने लंपास

एमजीएम रुग्णालयातून दागिने लंपास

Published on

एमजीएम रुग्णालयातून दागिने लंपास
नवी मुंबई (वार्ताहर): वाशीतील एमजीएम रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी आलेल्या जांभुळकर दाम्पत्याच्या बॅगेतून पाच लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. तपासणीदरम्यान दागिने बॅगेत ठेवले होते. घरी गेल्यावर चोरी लक्षात आली. वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com