संतांचिया पायी हा माझा विश्वास ।
संतांचिया पायी हा माझा विश्वास
संत व सद्गुरूंच्या पादुका दर्शनासाठी लोटला जनसागर
संतांचिया पायी हा माझा विश्वास ।
सर्वभावे दास झालो त्यांचा ।।
तेचि माझे हित करिती सकळ ।
जेणे हा गोपाळ कृपा करी ।।
अभंगपंक्तींचा हा भावार्थ जणू साकार झाल्याप्रमाणे, महाराष्ट्रातील २१ संत व सद्गुरूंच्या पादुकांचा एकत्रित दर्शन सोहळा वरळीत भक्तिभावात सुरू झाला आहे. वारकरी परंपरेचा सुगंध, नामस्मरणाचा गजर आणि संतचरणी नतमस्तक होण्याची भक्तांची ओढ यामुळे परिसर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघत असून, हजारो भाविक या अद्वितीय सोहळ्याचा लाभ घेत आहेत.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या भक्ती शक्ती व्यासपीठ आणि एपी ग्लोबाले यांनी आयोजित केलेल्या वरळीतील एनएससीआय डोम येथे संत आणि सद्गुरूंच्या २१ पादुकांचा दर्शन सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. रविवारीही (ता. २२) सकाळी १० ते रात्री ९पर्यंत पादुका दर्शन सोहळा सुरू राहणार आहे. शिवाय सकाळी १० वाजता आध्यात्मिक व योगगुरू श्री एम यांच्या मार्गदर्शानाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.
‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती...’ याची अनुभूती भाविक घेत आहेत. नेटके नियोजन, सहज-सुलभ दर्शन, ध्यानधारणा, हरिनामाचा अखंड गजर, विविध संस्था व शालेय मुलांनी गुरूचरणी अर्पण केलेली संगीत सेवा यामुळे भारावलेल्या भाविकांनी ‘सकाळ’च्या या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

