पर्यावरण संवर्धनाची प्रदर्शनातून जनजागृती
पर्यावरण संवर्धनाची प्रदर्शनातून जनजागृती
मिरा-भाईंदर पालिकेचा वसुंधरा महोत्सव सुरू
भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : माझी वसुंधरा अभियानांतर्गत मिरा-भाईंदर पालिकेने वसुंधरा महोत्सव भरवला होता. या महोत्सवाच्या माध्यमातून पंचतत्त्वांवर(भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश) आधारित मूल्यांच्या माहितीची जनजागृतीसाठी प्रदर्शनाते आयोजन करण्यात आले होते.
पर्यावरण व संस्कृती संवर्धनासाठी विविध स्टॉल्स, औषधी वनस्पतींची बियाणे, रोपे, नर्सरी, आयुर्वेदिक आणि सौंदर्य उत्पादने, हस्तकला व हस्तमाग वस्त्रांचे प्रदर्शन यांचा समावेश होता. याशिवाय, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सोलार सेल्स, सोलार बॅटरी, रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या पर्यावरणपूरक उपाययोजनांचे सादरीकरणही करण्यात आले. याव्यतिरिक्त नागरिक व शाळेतील मुलांना पर्यावरणाचे महत्त्व, जतन, संरक्षण व जनजागृती करण्याच्या दृष्टीने महापालिकेतर्फे वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात परसबाग स्पर्धा, पर्यावरणपुरक प्रकल्प प्रदर्शन, मॅग्रोज क्लिनिंग स्पर्धा, वॉल पेंटिंग स्पर्धा, सर्वोत्तम हरित शाळा, सर्वोत्तम हरित हाऊसिंग सोसायटीचा समावेश होता.
------------------------------------
पर्यावरण संवर्धन ही केवळ शासकीय जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगून महापौर डिंपल विनोद मेहता यांनी प्रत्येक नागरिकाने ‘एक झाड - एक जबाबदारी’ हा संकल्प करावा.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

