गुंदले परिसरात नियमबाह्य वाहतूक

गुंदले परिसरात नियमबाह्य वाहतूक

Published on

गुंदले परिसरात नियमबाह्य वाहतूक
बोईसर, ता. २२ (वार्ताहर) : गुंदले परिसरातील मुख्य रस्त्यावरून सेंट्रिंग साहित्य वाहून नेणाऱ्या टेम्पोची वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे, संबंधित वाहनाचा क्रमांक स्पष्टपणे दिसत नसतानाही वाहने मार्गक्रमण करत आहेत.
या मार्गावर दोन पोलिस चौक्या असतानाही संबंधित वाहनावर कोणतीही कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेली ही वाहतूक अपघातास आमंत्रण देणारी ठरत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. उद्या एखादा अनर्थ घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com