मूक मोर्चा बैठकीनंतर स्थगित

मूक मोर्चा बैठकीनंतर स्थगित

Published on

मूक मोर्चा बैठकीनंतर स्थगित
बोईसर, ता. २२ (वार्ताहर) ः तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी बोईसर एमआयडीसीविरोधात पोलिस ठाण्याविरोधात मूक मोर्चा अखेर स्थगित करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
स्पेक्ट्रोकेम प्रा. लि., ऑर्गनो फाइन केमिकल्स येथील १२४ स्थानिक कामगार ५३ दिवसांपासून कामबंद आंदोलन करत आहेत. दोन वर्षांपासून प्रलंबित मागण्या, पगारवाढीबाबत कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. न्यायालयाने तयार माल कामगार प्रतिनिधींच्या उपस्थितीत तपासून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते; मात्र प्रतिनिधी अनुपस्थित असताना कच्चा, अपूर्ण मालही बाहेर काढल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला. यानंतर न्यायालयाने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते; पण पोलिस प्रशासन कंपनीला संरक्षण देत असल्याचा संशय निर्माण झाल्याने रविवारी (ता. २२) सकाळी १० वाजता पोलिस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.

Marathi News Esakal
www.esakal.com