‘पर्ल ऍग्रो’चे कार्यालय निशाण्यावर

‘पर्ल ऍग्रो’चे कार्यालय निशाण्यावर

Published on

‘पर्ल ॲग्रो’चे कार्यालय निशाण्यावर
डहाणूतील कार्यालयावर नगर परिषदेकडून जप्तीची नोटीस
कासा, ता. २२ (बातमीदार)ः देशभरातील कोट्यवधी गुंतवणूकदारांची ‘पर्ल ॲग्रो कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीने हजारो कोटींची फसवणूक केली आहे.
या कंपनीच्या डहाणू येथील कार्यालयावर नगरपरिषदेने थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्तीची नोटीस बजावली आहे.
‘पर्ल ॲग्रो कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली अनेक नागरिकांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. डहाणू, पालघर परिसरातील अनेक कष्टकरी गुंतवणूकदारांचा प्रकरणात समावेश आहे. या कंपनीचे डहाणूतील वैभव कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय आहे. या कार्यालयाचे एक लाख ९० हजार रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. १० वर्षांपासून कार्यालय कुलूपबंद अवस्थेत आहे. कर भरला नसल्याने नगर परिषदेने कठोर भूमिका घेत विद्युतपुरवठा खंडित करण्यासह मालमत्ता जप्तीची नोटीस दिली आहे.
------------------------------
२०१४ मध्ये कारवाई
- ‘पर्ल ॲग्रो कॉर्पोरेशन लिमिटेड’ (पीएसीएल) ही कंपनी निर्मलसिंग भंगू यांनी स्थापन केली होती. ‘पॉन्झी स्कीम’च्या माध्यमातून देशातील ५.८ कोटी गुंतवणूकदारांकडून ४९ हजार ते ६० हजार कोटींची उभारणी करण्यात आली. जमिनीचे तुकडे देण्याचे किंवा अवास्तव परताव्याचे प्रलोभन दाखवले. प्रत्यक्षात कोणतीही जमीन देण्यात आली नाही. या योजनेवर २०१४ मध्ये सेबीने बंदी घातली, तर २०१६ मध्ये सीबीआयने मुख्य आरोपींना अटक केली. सध्या ‘लोढा समिती’ मार्फत मालमत्ता विक्री करून गुंतवणूकदारांना परतावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com