२२ वर्षांनंतर आठवणींना उजाळा
२२ वर्षांनंतर आठवणींना उजाळा
आचार्य विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
कासा, ता. २२ (बातमीदार)ः धावपळीच्या, व्यस्त जीवनशैलीतून थोडासा मोकळा श्वास घेत आचार्य विद्यालयातील २००३-४ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे शाळेतील स्नेहबंध नव्याने दृढ झाले आहेत.
२२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एकत्र आल्याने माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रांत कार्यरत असूनही ७० ते ७५ विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान अनुभव कथन, आठवणींची देवाणघेवाण, जुन्या मित्रांसोबत घालवलेले क्षणांमुळे वातावरण भारावून गेले. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या २२ वर्षांत निवृत्त झालेले शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांचा एकत्रित स्नेहमेळावा, असा दुहेरी सोहळा अनुभवायला मिळाला.
-----------------------------------
अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू
- शाळेतील प्रत्येक कोपऱ्यात अनेक आठवणी दडलेल्या आहेत. त्या आठवणींना आज पुन्हा उजाळा मिळाला, तर रवी खंबायत आणि अपूर्वा घारपुरे यांनी आपल्या आठवणी सांगताना पुन्हा एकदा वर्गात बसल्याचा अनुभव मिळाल्याचे सांगितले.
शालेय जीवनातील गमतीजमती, केलेल्या चुकादेखील हसत-हसत शेअर केल्या. निवृत्त शिक्षकांनीही विद्यार्थ्यांप्रतीचे प्रेम, अभिमान व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी निरोप घेताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

