भोगावती नदी घाटाची स्वच्छता व वृक्षारोपण

भोगावती नदी घाटाची स्वच्छता व वृक्षारोपण

Published on

भोगावती नदी घाटाची स्वच्छता व वृक्षारोपण
पेण, ता. २२ (वार्ताहर) : सामाजिक संस्था आणि वन विभाग यांच्या माध्यमातून पेण येथे जागतिक वनदिन व जलदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त भोगावती नदीपात्रातील घाटाची स्वच्छता करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
वाढती लोकसंख्येमुळे सिमेंट काँक्रीटचे जंगल वाढत आहे. यासोबतच वाहनांची गर्दी तसेच कारखान्यांमधून निघणारा धूर प्रदूषणात भर पडत असून, वनसंपत्ती, जलसंपत्ती व मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जंगल वाचवणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पेण शहरातील भोगावती नदीपात्रात अनेक ठिकाणहून सांडपाणी, घाण, कचरा येत असल्याने पाण्याची दुर्गंधी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भोगावती नदी पात्रात स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले‌. या उपक्रमात वृक्षप्रेमी उदय मानकवळे, मनोरमा मानकवळे, सामाजिक वनीकरण, वन विभाग, ॲबिशन ग्रुप महाडिक वाडी, साखर चौक गणेशोत्सव मंडळ गोळीबार मैदान, प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आदींनी यामध्ये सहभाग घेतला होता.

Marathi News Esakal
www.esakal.com