राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाचा राजीनामा

राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाचा राजीनामा

Published on

राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाचा राजीनामा
निष्ठावंतांना डावल्याची खंत; श्रीवर्धनमध्ये पक्षांतर्गत नाराजी उफाळली
श्रीवर्धन, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली असून, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. याबाबत आता खासदार सुनील तटकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दर्शन विचारे यांनी २०११ पासून तालुका अध्यक्ष म्हणून पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम केले. विविध निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका बळकट करण्यासाठी प्रयत्न केले असून, विचारधारा तळागाळात पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्य केले. मात्र, अलीकडील नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर पक्षातील काही निर्णय प्रक्रियेत स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची भावना निर्माण झाली आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, काही कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यानंतरही त्यांना महत्त्व दिले जात आहे, तर निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दुय्यम स्थान दिले जात आहे. यामुळे संघटनात्मक एकात्मतेला धक्का बसत असून, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपेक्षित पाठबळ मिळाले नाही, अशी खंतही त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. पक्षाची धुरा सांभाळताना प्रामाणिकपणे काम केले. मात्र, माझ्या विचारांना व कामाला योग्य न्याय मिळाला नाही, असेही त्यांनी नमूद केले असून, त्यांनी तटकरे यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. दरम्यान, या राजीनाम्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उघड झाले असून, स्थानिक राजकारणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com