शेतकरी सन्मान निधी योजेनेचे लाईव्ह प्रक्षेपण
शेतकरी सन्मान निधी योजेनेचे लाइव्ह प्रक्षेपण
शेतकरीवर्गाचा मोठा सहभाग
रोहा, ता. २२ (बातमीदार) : शेतकरी सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण किल्ला कृषी विज्ञान केंद्र, रोहा येथे आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत परंपरागत कृषी विकास योजनेच्या अंतर्गत हा कार्यक्रम पार पडला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० ते सायं ५ या वेळेत कार्यक्रम झाला. डॉ. मनोज तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. आरेकर, डॉ. मांजरेकर, डॉ. मांडवकर, नितीन मोरे तसेच प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. तज्ज्ञांनी नैसर्गिक शेती, जैविक निविष्ठा, कीडरोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात शेतकऱ्यांनी विविध युनिटला भेट देऊन माहिती घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

