अनिष्ट रूढी, पंरपरांविरोधात एल्गार

अनिष्ट रूढी, पंरपरांविरोधात एल्गार

Published on

अनिष्ट रूढी, परंपरांविरोधात एल्गार
मोखाड्यात विविध सामाजिक संस्थांचा पुढाकार
मोखाडा, ता. २२ (बातमीदार)ः मोखाडा तहसील कार्यालय येथे परिवर्तन महिला संस्था आणि मिरॅकल फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गाव बाल संरक्षण समितीची तालुकास्तरीय बैठक झाली. या बैठकीत बालविवाह रोखणे, सशक्त बालक घडविण्यावर चर्चा करण्यात आली.
मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील २२३ अंगणवाडी सेविका, आशासेविका, ४५ गाव बाल संरक्षण समिती सदस्य, ग्रामस्थ एकत्र आले होते. या वेळी गावातील प्रत्येक बालक सुरक्षित, सशक्त आणि आनंदी कसं राहील? मुलांच्या अडचणी, त्यांचे हक्क, त्यांचं बालपण आणि त्यांचं भविष्य यावर मनापासून चर्चा घडवण्यात आली. गावात काम करताना येणाऱ्या अडचणी, मुलांशी संवाद कसा साधायचा, यावर अनुभव मांडण्यात आले. बालविवाह थांबवणं, बाल हक्क जपणे, पुढील पिढीचं भविष्य सुरक्षित करणे, ही केवळ सामाजिक गरज नाही, तर देशाच्या प्रगतीची पायाभरणी आहे, हे बैठकीत अधोरेखित झाले. तसेच विकसित भारत २०४७ या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनात सशक्त, शिक्षित आणि सुरक्षित बालक हीच देशाच्या प्रगतीची खरी ताकद आहे, अशी भावना मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.
-------------------------
ग्राम सक्षमीकरणावर भर
परिवर्तन महिला संस्था, मिरॅकल फाउंडेशन इंडिया यांनी कामांचा आढावा सादर केला. प्रत्येक उपक्रमामागे उद्देश मुलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, सक्षम बनवणे, गावात बालविवाह होऊ देणार नाही असा होता. आतापासून मुलांचे ऐकणे, त्यांना समजून घेणे ही आमची जबाबदारी असल्याचा नारा बालस्नेही चळवळीतून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com