श्रीवर्धन अक्कलकोट बससेवा सुरू.
हरिहरेश्वर श्रीवर्धन अक्कलकोट बससेवा सुरू
श्रीवर्धन, ता. २२ (वार्ताहर) ः श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन-अक्कलकोट बससेवेची प्रवाशांनी मागणी केली होती. यानुसार ही नवीन बससेवा येत्या १५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रवासी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
श्रीवर्धन तालुका हे राज्यातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. या बससेवेमुळे सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रवासीवर्गाला कोकणात येण्यास सोयीस्कर होणार असून, श्रीवर्धनमधील पर्यटनवाढीस लागेल. अक्कलकोट हे स्वामी समर्थ महाराज यांचे स्थान म्हणून नावाजलेले आहे. त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यातील भिगवण हे गाव उजनी धरणामुळे प्रसिद्ध असून, हिवाळ्यात येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या आगमनामुळे श्रीवर्धन तालुक्यातील पक्षीप्रेमी व पर्यटकांना या बससेवेचा फायदा होणार आहे. यानुसार श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासीवर्गाने आगारप्रमुख महिबूब मणेर यांच्याकडे हरिहरेश्वर श्रीवर्धन अक्कलकोट बससेवेसाठी पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत आगार प्रमुखांनी ही बससेवा १८ एप्रिलपासून नियमित सुरू करीत असल्याचे सांगितले आहे.
बसचे वेळापत्रक आणि मार्ग
हरिहरेश्वर ते अक्कलकोट : सकाळी ९:३० वाजता हरिहरेश्वर येथून सुटेल.
श्रीवर्धन स्थानक : सकाळी १०:०० वाजता बस श्रीवर्धनमध्ये दाखल होईल.
परतीचा प्रवास : अक्कलकोट स्थानकातून सकाळी ९:०० वाजता ही बस परतीसाठी मार्गस्थ होईल.
प्रवासाचा मार्गल : ही बस म्हसळा-माणगाव-पुणे-भिगवण-इंदापूर-सोलापूर मार्गे अक्कलकोट अशी धावेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

