धारावीत कक्कया समाजाचा वधू-वर मेळावा उत्साहात
धारावीत कक्कया समाजाचा वधू-वर मेळावा उत्साहात
धारावी, ता. २२ (बातमीदार) : कक्कया समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, धारावी यांच्या वतीने समाजातील इच्छुक वधू-वर, घटस्फोटित तसेच विधवा-विधुर आणि त्यांच्या पालकांसाठी परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा शनिवारी (ता. २१) सायन येथील डी. एस. हायस्कूलमध्ये पार पडला. या उपक्रमाला इच्छुक वधू-वर आणि त्यांच्या पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर तसेच महाराष्ट्रातील विविध भागांत कक्कया समाजाची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत तरुण-तरुणींचे विवाह जुळणे अवघड होत चालले असून, घटस्फोटित आणि विधवा-विधुरांसाठी योग्य जोडीदार मिळणे अधिक कठीण बनले आहे. ही गरज लक्षात घेऊन मंडळाने गेल्या वर्षापासून अशा प्रकारचा वधू-वर मेळावा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.
धारावीतील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असून, समाजाकडून त्यास भरभरून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष हेमंत व्हटकर यांनी दिली.
मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त उपजिल्हाधिकारी संदीप कळंबे, ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत कदम, नगरसेविका अर्चना अविरत शिंदे, शिवलिंग व्हटकर, समस्त कक्कया महासंघाचे अध्यक्ष निवृत्ती सावळकर, राम कोकणे, महादेव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सचिव मसाजी व्हटकर, खजिनदार विजय शिंदे, कार्याध्यक्ष मनोहर सोनवणे तसेच सर्व विश्वस्त आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

