मुलुंडमध्ये आई एकविरा देवीच्या भव्य पालखी पदयात्रेला उत्साहात प्रारंभ
मुलुंडमध्ये आई एकवीरा देवीच्या भव्य पालखी पदयात्रेला उत्साहात प्रारंभ
मुलुंड, ता. २२ (बातमीदार) : मुलुंड पूर्व येथील आई एकवीरा देवी भक्त मंडळातर्फे मुलुंड ते श्री क्षेत्र कार्ला (लोणावळा) या मार्गावर भव्य पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (ता. २१ मार्च) पासून सुरू झालेली ही पदयात्रा २६ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे.
या पदयात्रेची सुरुवात श्री तुंगवतेश्वर मंदिर, राजे संभाजी पार्क, मुलुंड पूर्व येथून सायंकाळी ४ वाजता झाली. आई एकवीरा देवीचा जयघोष करीत ढोल-ताशे, बँडच्या गजरात आणि उत्साही वातावरणात पालखी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. या पवित्र पदयात्रेत माजी आमदार चरणसिंग सप्रा, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, कैलास पाटील, नगरसेविका दीपिका घाग, कौशिक पाटील, कमलेश पाटील, किशोर मुंडेकल, राजन भोसले यांच्यासह मुलुंड परिसरातील मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान भक्तगण भजन-कीर्तन, नामस्मरण करीत आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र कार्ला (लोणावळा)कडे प्रस्थान करणार आहेत. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

