सोनसाखळी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात!

सोनसाखळी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात!

Published on

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : सकाळी वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला रबाळे पोलिसांनी फिल्मीस्टाइलने अटक केली आहे. अजिंक्य अनंत शिंदे (वय ३६) याने घणसोली परिसरातील एका ५४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीने खेचून पलायन केले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

घणसोली येथे राहणाऱ्या अनिता राजकुमार गुप्ता (५४) या शनिवारी (ता. १४) सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक करून आपल्या सोसायटीमध्ये स्कूटी पार्क करत होत्या. या वेळी दबा धरून बसलेल्या लुटारूने त्यांच्या गळ्यातील सव्वा लाखाची सोन्याची चेन जबरीने खेचून पलायन केले होते. रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. पोलिसांनी अजिंक्य शिंदे याला कामोठे येथून अटक केली. त्याच्यावर यापूर्वी पनवेल शहर, रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com