तिकीट तपासणीसांचा सन्मान

तिकीट तपासणीसांचा सन्मान

Published on

तिकीट तपासनीसांचा सन्मान

मुंबई, ता. २२ (बातमीदार) : तिकीट तपासनीस परिवार मुंबईतर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला माटुंगा (पूर्व) येथील मध्य रेल्वे ऑफिसर क्लब हॉलमध्ये हिंदू नववर्ष स्वागत सोहळा आणि वर्षभर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांचा सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी डीआरएम हिरेश मीना यांच्या हस्ते वर्षभर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३५ तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट तिकीट तपासनीस कार्यालय म्हणून पनवेल आणि भायखळा सीटीआय कार्यालयांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्काराने सुनील कुमार बी यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन परिवाराचे अध्यक्ष संजय आंग्रे, कार्याध्यक्ष राजन सुर्वे, सचिव डी. व्ही. चिंदरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियोजनामुळे शक्य झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी कलाकारांनीही आपली कला सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com