प्रयोगशाळेचे उत्साहात उद्घाटन
प्रयोगशाळेचे उत्साहात उद्घाटन
घाटकोपर (बातमीदार) : विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचालित विकास विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, विक्रोळी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक ‘न्यूवेल टेक इनोव्हेशन प्रयोगशाळे’चे उद्घाटन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. नेवल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक कृष्णन सुब्रमण्यम, शाळेच्या प्रा. वैष्णवी विकास राऊत, इन पॉवरचे संचालक सुशील मुणगेकर, सह संस्थापक अरविंद नारायणन तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनघा राऊत या वेळी उपस्थित होत्या. याशिवाय संस्थेच्या धोरणात्मक सल्लागार कविता दामले व प्रशासकीय अधिकारी नीलवर्ण चंद्रशेखर यांनीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली. या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना २१व्या शतकातील कौशल्ये आत्मसात करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. समस्या सोडवण्याची क्षमता, सर्जनशीलता, तांत्रिक ज्ञान, सांघिक कार्य आणि संवाद कौशल्यांचा विकास या माध्यमातून हे साध्य होईल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनुभवाधारित आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यात आला असून, ही प्रयोगशाळा त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

