भिवंडीत भंगार गोदामाला आग

भिवंडीत भंगार गोदामाला आग

Published on

भिवंडीत भंगार गोदामाला आग
भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) : भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे रविवारी दुपारी भंगार गोदामाला भीषण आग लागली. या आगीत दोन गोदामे पूर्णतः खाक झाली. अग्निशमन दलाने दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गोदामांमध्ये कापड, प्लॅस्टिक आणि कागदाचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. गोदामाच्या शेजारील गवताला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही आग हळूहळू पसरत जाऊन शेजारील भंगार गोदामांपर्यंत पोहोचली आणि काही वेळातच तिने भीषण स्वरूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच खासगी टँकरच्या मदतीने आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दोन भंगार गोदामे पूर्णतः खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com