भक्तीची सायकलवारी

भक्तीची सायकलवारी

Published on

भक्तीची सायकलवारी
‘फिट इंडिया’च्या संदेशासह ‘पेडल वॉरिअर्स’ नतमस्तक!

​कल्याण, ता. २२ (बातमीदार) : श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवात मुंबईतील ‘पेडल वॉरिअर्स’ या सायकलिंग ग्रुपने सहभाग घेतला. प्रदूषणमुक्ती आणि उत्तम आरोग्याचा संदेश देऊन या ग्रुपच्या सदस्यांनी थेट सायकलवरून प्रवास करून २१ संतांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

या ग्रुपमध्ये ७० वर्षीय मंगला वैद्य या विशेष लक्षवेधी ठरल्या. वयाच्या सत्तरीतही त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी असा चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वी पूर्ण केला आहे. अध्यात्म आणि आरोग्य यांची सांगड घालण्यासाठी आम्ही सायकलने येण्याचे ठरवले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी आम्ही पंढरपूर ते पंजाब घुमान असा २,५०० किमीचा सायकल प्रवास पूर्ण केला आहे. आराेग्य सायकलिंगचा प्रसार करून आम्ही संतांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो आहोत, अशी माहिती ग्रुपचे सदस्य भरतकुमार मंडल यांनी दिली. ​या सायकलवारीत संतोष, आशीष, कुणाल आणि चिमुकल्या ‘चिंटू’चाही समावेश होता. एकाच छताखाली २१ संतांचे दर्शन घेता आले, हे आमच्यासाठी ऊर्जा देणारे असल्याचे या सायकलवीरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com