अधिकारी प्रतिक्रीया

अधिकारी प्रतिक्रीया

Published on

भक्तिभावाचा अप्रतिम सोहळा अनुभवायला मिळाला. एकाच ठिकाणी २१ पादुकांचे दर्शन होणे हा अनोखा योग्य जुळून आला असून, असा भक्तीचा सोहळा यापूर्वी पहिला नाही. धन्य झालो.
- सतीश भारतीय, मुख्य अधिकारी, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (म्हाडा)
----
हा खूपच चांगला उपक्रम आहे. भाविकांसाठी खूपच चांगली व्यवस्था ठेवण्यात करण्यात आली हाेती. आम्ही २१ ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
- डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय
----
भक्तिभावाचा हा अप्रतिम सोहळा आहे. एकाच ठिकाणी २१ पादुकांचे दर्शन होणे हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
----
२१ पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही भारावून गेलो. आम्ही याआधी कधीच अशा ठिकाणी गेलो नव्हतो. ही संधी उपलब्ध करून दिली. आम्ही धन्य झालो.
- डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय
----
धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महाराष्ट्राचा वारसा जपण्याचे आणि पुढे नेण्याचे काम ‘सकाळ माध्यम समूह’ करीत आहे.
- आनंद परांजपे, मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काॅँग्रेस (अजित पवार गट)
-----
श्रीगुरू पादुका दर्शन हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. या ठिकाणी २१ संतांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे आल्यावर एखाद्या तीर्थक्षेत्रात आल्याचे समाधान मिळते. संतांच्या पादुकांचे दर्शन ही खरोखरच दुर्मिळ गोष्ट आहे.
- मोहन कटारे,
स्वामी संस्था, परळ
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com