अंधेरीत अल्पवयीन मुलांकडून सहकाऱ्याची गुन्हा

अंधेरीत अल्पवयीन मुलांकडून सहकाऱ्याची गुन्हा

Published on

अंधेरीत अल्पवयीन मुलांकडून सहकाऱ्याची हत्या

मुंबई, ता. २२ : कुर्ला, भांडुपपाठोपाठ अंधेरीत अल्पवयीन तरुणांकडून हत्येचा गंभीर गुन्हा घडला आहे. अंधेरीतील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणांनी निव्वळ संशयातून अल्पवयीन सहकाऱ्याची गळा आवळून हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आणि आरोपी तरुण अंधेरीतील एका हॉटेलमध्ये काम करीत होते. मालकाने तिघांना राहण्यासाठी डी. एन. नगर परिसरात भाड्याने खोली घेऊन दिली होती. अलीकडे मृत तरुणासोबत अन्य दोघांचे वरचेवर वाद होऊ लागले. गुरुवारी याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. दोघांनी तिसऱ्याची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर भानावर आलेल्या दोघांनी सहकाऱ्याचा मृतदेह खोलीतच ठेवला आणि शनिवारी तो पंख्याला लटकवून आत्महत्येचा आभास निर्माण केला. मात्र शवचिकित्सेत ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुरुवातीलाच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दोघांकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा कबूल केला. याआधी भांडुपमध्ये तीन अल्पवयीन तरुणांनी सोबत शिकणाऱ्या मित्राची हत्या करून तो पोहता पोहता बुडाल्याचा आभास निर्माण केला होता. तर गेल्याच आठवड्यात कुर्ला येथे अल्पवयीन तरुणाने रिक्षात बसण्यावरून झालेल्या वादात चालकाची भररस्त्यात हत्या केली होती.

Marathi News Esakal
www.esakal.com