श्री महाअवतार बाबाजींची श्रद्धा मला येथे घेऊन आली
श्री महाअवतार बाबाजींची
श्रद्धा मला येथे घेऊन आली
दिल्लीहून आलेल्या आशा कुमारी यांच्या भावना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : निस्सीम भक्ती काय असते, जेव्हा भक्ती मनापासून असते, तेव्हा देवाची कृपा अनुभवायला मिळते, याची अनुभूती रविवारी (ता. २२) आशा कुमारी यांना आली. त्या दिल्लीहून श्रीगुरू पादुका दर्शन साेहळ्याला आल्या हाेत्या. श्री महाअवतार बाबाजींची श्रद्धा मला येथे घेऊन आल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.
आशा कुमारी या श्री महाअवतार बाबाजी आणि श्री एम यांच्या निस्सीम भक्त आहेत. त्या मूळच्या दिल्ली येथे राहणाऱ्या आहेत. त्यांचे या सोहळ्यात येण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. शनिवारी (ता. २१) रात्री टीव्हीवर त्यांनी या उत्सवाची आणि रविवारी (ता. २२) सकाळी होणाऱ्या श्री एम यांच्या व्याख्यानाबाबत त्यांना समजले. त्यानंतर आशा कुमारी यांना रात्रभर झोप लागली नाही आणि आपण मुंबईला जाऊन हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहावा असे मनात आले आणि त्यांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. पहाटे ४.३०चे दिल्लीहून विमान पकडून सकाळी मुंबई विमानतळाला उतरल्या आणि १० वाजता त्या वरळी डोमस्थित उत्सवात पोहोचल्या. त्यांनी श्री एम यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांचे व्याख्यान ऐकले. त्यानंतर श्री एम यांची भेट घेतली. त्यांचा आशीर्वादही घेतल्याचे आशा कुमारी यांनी सांगितले.
आपण अचानक घेतलेल्या निर्णयाचा अजिबात पाश्चात्ताप झाला नाही. आपण इथे आल्यावर वेगळ्याच भक्तिमय विश्वात गेलो, अशी भावना आशा कुमारी यांनी व्यक्त केली. तसेच आधी नवी मुंबईतील पहिल्या पादुका दर्शन सोहळ्यात येऊन गेलो होतो. भविष्यातही पुन्हा येण्याचा निश्चयही त्यांनी या वेळी बोलून दाखवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

