इच्छापेटीत अर्जांचा ढीग
इच्छापेटीत अर्जांचा ढीग
दोन दिवसांनंतर उघडलेल्या इच्छापेटीत निघाला इच्छा अर्जांचा ढीग
मुंबई, ता. २२ : श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवातील इच्छापेटीला भाविकांनी दाेन दिवसांत भरभरून प्रतिसाद दिला. दोन दिवसांत पत्रांनी भरलेली ही पेटी रविवारी सायंकाळी उघडण्यात आली. त्या वेळी पेटीतून अर्जांचा ढीग बाहेर काढण्यात आला. त्या अर्जांची संख्या हजारोंच्या संख्येने होती. या पेटीत अनेक मान्यवरांसह प्रसिद्ध सेनेअभिनेते, तारका, साहित्यिक आणि सामान्य माणसांनी आपल्या इच्छा लिहून पेटीत टाकल्या होत्या.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘भक्ती-शक्ती व्यासपीठ आणि ‘एपी ग्लाेबाले’ यांच्या वतीने आयाेजित श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवात हजारो भाविकांनी अर्जामध्ये आपल्या इच्छा लिहून त्या पेटीत जमा केल्या होत्या. अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री प्रीती झिंटा यांनीदेखील यात सहभाग घेतला. रविवारी सर्व अर्जांची छाननी करून अर्जातील इच्छेप्रमाणे त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या माध्यमातून कुणी आध्यात्मिक सेवेसाठी पुढाकार घेण्याची, तर कुणी देणगी देण्यासाठी तयारी दर्शवली आहे. वंचित घटकांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठीही अनेक जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. काहींनी आरोग्यविषयक मदत करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.
---
पोलिसांचाही सहभाग
इच्छापेटी उपक्रमाला भाविकांसोबत मुंबई पोलिसांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला. पोलिसांनी इच्छा अर्ज भरून आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त केल्या.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

