

तहानलेल्या पाखरांसाठी पाण्याची सोय
कल्याणमध्ये वॉर फाउंडेशनतर्फे जलपात्र वाटप
कल्याण, ता. २३ (बातमीदार) : वाढत्या उन्हामुळे लाहीलाही होत असताना माणसांप्रमाणेच पशू-पक्षीही पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. ही गरज ओळखून जागतिक चिमणी दिनानिमित्त कल्याणमधील वॉर फाउंडेशन या संस्थेने पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागांत मातीच्या जलपात्रांचे वाटप करून या मुक्या जीवांची तहान भागवण्याचा स्तुत्य उपक्रम संस्थेने राबवला.
मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने निसर्गातील पाण्याचे स्रोत आटले आहेत. पाण्यासाठी चिमण्या आणि इतर पक्ष्यांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. पक्ष्यांना उन्हापासून दिलासा मिळावा आणि त्यांचे संवर्धन व्हावे, या सामाजिक हेतूने फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमधील गर्दीच्या आणि मोकळ्या जागेत ही जलपात्रे सुरक्षितरीत्या बसवली आहेत. केवळ संस्थाच नाही, तर प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या बाल्कनीत, खिडकीत किंवा अंगणात एका छोट्या पात्रात पाणी ठेवावे. आपला हा छोटासा प्रयत्न एखाद्या पक्ष्याचा जीव वाचवण्यासाठी जीवनदायी ठरू शकतो, असे आवाहन वॉर फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. शहरातील पक्षीप्रेमींनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले असून, सध्याच्या काळात चिमण्यांच्या अस्तित्वासाठी अशा प्रत्यक्ष कृतीची मोठी गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
मातीच्या पात्रांचे महत्त्व
संस्थेने या उपक्रमात मातीच्या पात्रांचा वापर करण्यावर भर दिला आहे. मातीच्या भांड्यामुळे उन्हातही पाणी थंड राहते, जे पक्ष्यांच्या आरोग्यासाठी हिताचे असते. फाउंडेशनच्या अनेक सदस्यांनी या मोहिमेत हिरिरीने सहभाग नोंदवून ही पात्रे कार्यान्वित केली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.