

विलेपार्ले पूर्वेत गटाराचे झाकण निखळले; नागरिकांच्या जीवितास धोका
मालाड, ता. १ (बातमीदार) : विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक द्वार क्रमांक दोन परिसरात गटाराचे झाकण निखळल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. झाकण मोडकळीस आल्यामुळे रस्त्यावर मोठी पोकळी तयार झाली असून, येथून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात हा धोका अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी तातडीने दखल घेऊन गटाराचे झाकण दुरुस्त करण्याची मागणी मुंबई महापालिकेकडे केली आहे. अपघात होण्यापूर्वीच प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
या खचलेल्या गटाराबाबत पालिकेच्या संबंधित विभागाला माहिती देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. जर झाकण खचून अपघात घडला, तर जबाबदारी कोणाची, असा प्रश्न रहिवासी उत्कर्ष बोर्ले यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.