आमणेच्या उपसरपंचपदी लिलेश पाटील
वज्रेश्वरी (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील आमणे-आमणेपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ॲड. लिलेश उत्तम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड सरपंच विश्वपाल केणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लिलेश पाटील हे व्यवसायाने वकील असून सामाजिक आणि ग्रामविकासाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या निवडीमुळे परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. निवड जाहीर होताच ग्रामस्थांनी त्यांचा भव्य सत्कार करत जल्लोषात मिरवणूक काढली. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी लिलेश पाटील यांनी ग्रामस्थ, पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. निवडीच्या निमित्ताने विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली गावाचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

