वाणगावच्या बीटचा दिल्लीत गोडवा

वाणगावच्या बीटचा दिल्लीत गोडवा

Published on

वाणगावच्या बीटचा दिल्लीत गोडवा
चंडीगावातील शेतकऱ्याकडून सात एकरवर लागवड
सुनील कोकरे ः सकाळ वृत्तसेवा
वाणगाव, ता.२३ ः अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यानंतर पालघरच्या भूमीत बीट लागवडीचा आगळावेगळा प्रयोग वाणगावच्या चंडीगाव येथील शेतकऱ्याने केला आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई, वाशीतील बाजारपेठांबरोबर दिल्लीतही वाणगावचे बीट विकले जाणार आहे.
पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात भात शेतीचे होणारे नुकसान तर रब्बी हंगामात मिरची पिकावर रोग, किडींचे संकट, निसर्गाच्या बदललेल्या चक्रामुळे शेतीवर होणारा अनिष्ट परिणाम तर दुसरीकडे परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल करून आधुनिक विचारसरणीचा वापर करत शेतकरी कमी खर्चात शाश्वत उत्पादन देणाऱ्या पिकांकडे वळू लागले आहेत. स्थानिक पिकांवर ओढवलेले संकट, शाश्वत उत्पादन होत नसल्यामुळे पीक पद्धतीत बदल करत तब्बल सात एकर क्षेत्रावर बीट पिकाची लागवड करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
---------------------------
पुणे, दिल्लीत मागणी
दिल्लीमध्ये बीटसाठी मोठी मागणी असते. दिल्लीत बीटपासून आरोग्यदायी प्रोटीन पावडर बनवतात. त्यामुळे दिल्लीच्या मुख्य बाजारपेठेत प्रोटीन पावडर बनवण्याच्या फॅक्टरी मोठ्या प्रमाणात आहे. दिल्ली मार्केटमध्ये प्रति किलो १५ ते २० रुपये दराने बीटची विक्री होते. तर वाशी मार्केटमध्ये प्रति किलो ८ ते १० रुपये दराने बीट विक्री होते. स्थानिक ठिकाणी किरकोळ विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
------------------------------
बीटची प्रमुख वैशिष्ट्ये
- गोलाकार, मध्यम आकार
- बाह्यरंग गडद लाल
- पांढरी कडी नसणे हे प्रमुख वैशिष्ट्य
- खाण्यासाठी गोड, रसाळ
- वजन २५० ते ३०० ग्रॅम
----------------------------
औषध निर्मितीत वापर
औषध निर्मितीत प्रोटीन पावडर तयार करण्यासाठी बीडचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. रक्त वाढीसाठी, विशेषतः महिलांच्या शारीरिक कमतरता भरून काढण्यासाठी बीडचा वापर होतो. खाद्यपदार्थांच्या कंपन्यांमध्ये रंगाचा स्त्रोत म्हणून बीटचा वापर होतो. बीटची दीर्घकाळ साठवणूक करता येते.
----------------------------
निसर्गाचे बदलते चक्र, रोगराईमुळे अपेक्षित उत्पादन साध्य होत नसल्याने शेती पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीट पेरणीपासून साधारण ६० ते ७० दिवसांत पीक काढणीस तयार होते.
-कल्पेश राऊत, शेतकरी, चंडीगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com