बिबट्यांच्या दहशतीवर वनविभागाची जनजागृती मोहीम

बिबट्यांच्या दहशतीवर वनविभागाची जनजागृती मोहीम

Published on

बिबट्यांच्या दहशतीमुळे वन विभागाची जनजागृती मोहीम
नागरी निवाऱ्यात बैठक; सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती
जोगेश्‍वरी, ता. २३ (बातमीदार) : गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा परिसरात बिबट्यांचा वाढता वावर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर वन विभागातर्फे जनजागृती बैठक पार पडली.
संकल्प सहनिवास ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून संकल्प सहनिवास व रहेजा हाइट्स परिसरात सायंकाळनंतर बिबट्यांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
निखिल बनगर यांनी बिबट्याच्या वर्तनशास्त्राची माहिती दिली, तर निकेत शिंदे यांनी परिसरात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा सादर केला. बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, आवश्यक असल्यास पिंजरे लावण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या पी दक्षिण विभागातील आरोग्य अधिकारी डॉ. यादव यांनी भटकी कुत्री व मांजरे याबाबत महापालिकेची जबाबदारी स्पष्ट केली. संकल्प सहनिवास फेडरल सोसायटीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. वन विभागाच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांना दिलासा मिळाल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

नागरिकांना मार्गदर्शन
वन विभागाने परिसराची पाहणी करून जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. बैठकीत वन अधिकारी हेमंत फणसे यांनी बिबट्यापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी तसेच बिबट्या समोर आल्यास काय करावे आणि काय टाळावे, याबाबत मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com