चिमणी दिनानिमित्त घरटी रंगविण्याचा उपक्रम

चिमणी दिनानिमित्त घरटी रंगविण्याचा उपक्रम

Published on

चिमणी दिनानिमित्त घरटी रंगविण्याचा उपक्रम

धारावी, ता. २३ (बातमीदार) ः जागतिक चिमणी दिनानिमित्त धारावीतील मनोहर जोशी महाविद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी चिमण्यांची कृत्रिम घरटी रंगविण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कल्पकतेने घरटी सजवली.
‘स्पॅरोज शेल्टर’संस्थेतर्फे आयोजित या उपक्रमात तयार घरटी परिसरातील झाडांवर लावून चिमण्यांसाठी दाणा-पाण्याची सोय करण्याचे नियोजन करण्यात आले. ‘एक घरटे-एक विद्यार्थी’ या संकल्पनेतून घरट्यांची देखभाल विद्यार्थ्यांकडून केली जाणार आहे. या वेळी माजी आमदार बाबूराव माने, संस्थेचे प्रमुख प्रमोद माने व कला शिक्षक विशाल जाधव उपस्थित होते. चिमण्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com