फुटलेल्या चेंबरमुळे नागरिकांचा कोंडमारा
कल्याण-शिळ मार्गावर मृत्यूचा सापळा
फुटलेल्या चेंबरमुळे वाहतुकीचा बोजवारा; नागरिकांचा संताप
डोंबिवली, ता. २३ : कल्याण-शिळ या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर घारीवली ते मानपाडादरम्यान फुटलेल्या चेंबरमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मेट्रोच्या कामामुळे आधीच संथ झालेल्या वाहतुकीत या धोकादायक चेंबरने भर टाकली असून, वाहनचालकांना रोजचा प्रवास अक्षरशः जीव मुठीत धरून करावा लागत आहे.
कल्याण-शिळ मार्गावर सकाळी कामावर जाणाऱ्यांपासून ते सायंकाळी घरी परतणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच तासनतास कोंडीचा सामना करावा लागतो. फुटलेल्या चेंबरमध्ये एखादे वाहन अडकल्यास काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. शनिवार-रविवारी अवजड वाहनांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होते. उन्हाच्या तडाख्यात तासनतास अडकून पडल्याने वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच दिवा परिसरात रस्त्यात वाहनाचे चाक रुतल्याची घटना घडली होती. त्यातून कोणताही धडा न घेता प्रशासनाने घारीवली-मानपाडा येथील फुटलेल्या चेंबरकडे दुर्लक्ष केले आहे. दररोजचा प्रवास म्हणजे शिक्षा झाली आहे, अशी संतप्त भावना स्थानिक व्यक्त करत आहेत.
मेट्रो कामाचा आणि सुरक्षा रक्षकांचा अडथळा
मेट्रो-१२ प्रकल्पासाठी ये-जा करणारी अवजड वाहने या कोंडीला मुख्यत्वे कारणीभूत ठरत आहेत. कामाच्या ठिकाणी तैनात असलेले सुरक्षा रक्षक सर्वसामान्य वाहने थांबवून मेट्रोच्या मोठ्या वाहनांना प्राधान्य देत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सामान्य नागरिकांना यामुळे तिहेरी मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नागरिकांची मागणी
फुटलेली चेंबरची झाकणे तातडीने दुरुस्त करून रस्ता सुरक्षित करावा. लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करावे अन्यथा मोठ्या अपघाताची जबाबदारी प्रशासनावर असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

