नॅशनल लायब्ररीत १०९ वा वर्धापन दिन उत्साहात

नॅशनल लायब्ररीत १०९ वा वर्धापन दिन उत्साहात

Published on

नॅशनल लायब्ररीच्या १०९व्या वर्धापनदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई, ता. २३ : नॅशनल लायब्ररी, वांद्रे पश्चिम संस्थेचा १०९वा आणि वास्तूचा ७६वा वर्धापनदिन शनिवारी (ता. २८) सकाळी १० ते रात्री ८.३० या वेळेत संस्थेच्या सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
सकाळच्या सत्रात संस्थेचे अध्यक्ष तसेच सांस्कृतिक कार्य व पालकमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. या वेळी भारती बिर्जे डिग्गीकर लिखित आणि सुनील सामंत यांच्या ‘ई-साहित्य प्रतिष्ठान’तर्फे प्रकाशित ‘गीत शिवेश्वरायण’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. तसेच अशोक बेंडखळे लिखित व ‘ग्रंथाली’ प्रकाशित ‘अवचित गवसलेली पुस्तके’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक दीपक करंजीकर यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर दीपक करंजीकर ‘वैचारिक संपदा-महाराष्ट्राची’ या विषयावर व्याख्यान देतील.
दुपारच्या सत्रात भारती बिर्जे डिग्गीकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यात ज्योती कपिले, जयश्री चौधरी, मधुमंजिरी गटणे, प्रशांत डिंगणकर आणि सोनाली जगताप हे कवी सहभागी होतील. त्यानंतर रसिकांकिता थिएटर्स, मुंबई निर्मित राजन काजरोळकर यांचा ‘संधिकाली या अशा...’ हा एकपात्री बहुरूपी कार्यक्रम सादर होईल.
सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत ‘बहरला हा मधुमास नवा’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम होणार असून, सी. रामचंद्र, वसंत देसाई, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर आणि अजय-अतुल यांच्या संगीतबद्ध गाण्यांचा आस्वाद रसिकांना घेता येईल. या कार्यक्रमात अरुणा, मीता, प्रगती, शशी, प्रशांत राजन आणि संजय हे गायक सहभागी होणार असून, विवेक गुप्ते सूत्रसंचालन करतील.
या सर्व कार्यक्रमांसाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष प्रमोद महाडिक आणि प्रमुख कार्यवाह विद्याधर झारापकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com