कुणबी एकता मंचाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात

कुणबी एकता मंचाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात

Published on

कुणबी एकता मंचचा द्वितीय वर्धापन दिन साजरा
माणगाव, ता. २३ (वार्ताहर) : कुणबी एकता मंच संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा आणि विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबीर लोणेरे येथील एस. एस. निकम हायस्कूलमध्ये पार पडले. याप्रसंगी तज्ज्ञांनी करिअरच्या संधींबाबत करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य दिनेश हरवंडकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र टेंबे आणि स्वाती करकरे यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शेष, कुणबी समाज बत्तिशी विभागाचे अध्यक्ष राम टेंबे, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, पंढरी शेडगे, वामन बैकर, राजाराम टेंबे, सुभाष शिंदे, संजय उभारे, संजीवनी उभारे, संतोष भात्रे, नंदू जांभरे, सुरेंद्र मनवे, नरेश कालेकर, नथुराम अंधेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती मिळावी, यासाठी शैक्षणिक स्टॉल्सची उभारणी करण्यात आली. अभियांत्रिकी, पदविका, नर्सिंग, लॉ आणि फार्मसी, हॉटेल व्यवस्थापनचे अभ्यासक्रम, कौशल्य विकास, आयटीआय कोर्सेस, पोलिस व सैन्य भरती स्पर्धा परीक्षांबाबत माहिती, जेईई-नीट मार्गदर्शन तसेच ई-सेवा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेबद्दल मंचचे अध्यक्ष विनेश डवले, नीलेश केसरकर, चंद्रकांत चेरफळे, मंगेश शिंदे, नीलेश टेंबे, राम भोस्तेकर, सुजित भोजने, मोहन शेडगे, ज्ञानेश्वर खाडे, संजय पाटोळे, निवेश शिर्के, परेश अंधेरे, चंद्रकांत भोजने, शिवतेज ढवळ, रमेश मोरे, अमित दांडेकर, महेश तळवटकर, अविनाश उतेकर, केशव जांभरे, राजेश अंधेरे, सचिन खिडबिडे, किरण शिंदे, अभिजित भोजने, किरण भोजने आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com