ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे ‘स्मारक समिती’ची मागणी

ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे ‘स्मारक समिती’ची मागणी

Published on

तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरातील तथागत बुद्ध स्मारक येथे दरवर्षी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यासोबतच ‘स्मारक समिती’ स्थापन करावी, अशी मागणी भाजप नेते विकास सोरटे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त, महापौर, तसेच अ प्रभाग समिती अध्यक्षांना निवेदन दिले.

नवी मुंबईतील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे ठिकाण पर्यटन व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र बनले असून येथे उभारलेले तथागत बुद्ध स्मारक बौद्धबांधवांसह सर्व नागरिकांसाठी श्रद्धास्थान ठरत आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक येथे अभिवादनासाठी उपस्थित राहतात. या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या दिवसांमध्ये स्मारक परिसरात आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, विधिवत पूजा व अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचने आणि भगवान बुद्ध तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित उपक्रम राबवावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकाअंतर्गत संबंधित प्रभाग समिती अध्यक्ष किंवा सामाजिक विभागाच्या उपायुक्तांच्या देखरेखीखाली स्मारक व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com