रुग्णालयाच्या नामकरणावरून वाद चिघळला

रुग्णालयाच्या नामकरणावरून वाद चिघळला

Published on

वाशी, ता. २३ (बातमीदार) : वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यात सुरू असलेला वाद नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत पुन्हा एकदा उफाळून आला. म्हात्रे यांच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या प्रस्तावाला भाजपच्याच नगरसेवकांनी दुसऱ्यांदा विरोध दर्शवत थेट धक्का दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाला शीख धर्मगुरू गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती; मात्र या घोषणेलाही भाजपच्या काही नगरसेवकांनी विरोध करत वेगळी भूमिका घेतली.

खारघर येथे गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली होती. त्यानंतर महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी महासभेत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. बेलापूर सेक्टर १५ येथे उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा उल्लेखही या प्रस्तावात करण्यात आला होता; मात्र चर्चेदरम्यान भाजपचे नगरसेवक सूरज पाटील यांनी या प्रस्तावात रुग्णालयाच्या नेमक्या भूखंडाचा उल्लेख नसल्याची हरकत घेतली. त्याला सभागृह नेते सागर नाईक यांनीही पाठिंबा दिला. सिडकोची नवी मुंबई ही फक्त दिघा ते बेलापूरपुरती मर्यादित नसून पनवेल, तळोजा, कळंबोली, उरणपर्यंत विस्तारलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या विस्तारित भागातील रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार नाव देण्यात यावे, अशी सुधारणा करून अखेर प्रस्ताव मंजूर करण्यात आला; मात्र या सगळ्या घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com