पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

Published on

पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती
वेती-वरोती गावातील जलजीवन योजना ठप्प

कासा, ता. २३ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील वेती-वरोती ग्रामपंचायतीची जलजीवन योजना पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट बनली असून तीव्र पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांवर भटकंतीची वेळ आली आहे.
वेती येथील कातकरी पाड्यात जलजीवन योजनेअंतर्गत विहीर बांधून पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली होती; मात्र अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत पडून आहे. तसेच वरोती, वेती, सूर्यनगर परिसरात योजनेअंतर्गत तीन विहिरींचे बांधकाम करण्यात आले असले तरी त्याचा प्रत्यक्ष उपयोग नागरिकांना होत नाही. या भागातून एमएमआरडीएच्या जलप्रकल्पाद्वारे वसई-विरार तसेच मुंबईला पाणीपुरवठा केला जातो; मात्र स्थानिक गावांना मात्र पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जलजीवन योजना पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
-------------------------
आंदोलनाचा इशारा
वेती-वरोती ग्रामपंचायतीतील जलजीवन योजनेत भ्रष्टाचार झाला असून कामे निकृष्ट दर्जाची आहेत. अनेक ठिकाणी योजना सुरू असताना अजूनही पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे तातडीने आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांनी दिला आहे. तर डहाणू जलजीवन पाणीपुरवठा अधिकारी अस्मिता राजापुरे यांच्याशी संपर्क साधला असता वेती-वरोती येथील योजनेची कामे संथगतीने सुरू असून लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com