क्रांतीकारक शाहिद भगतसिंग  यांना करंदेकर  कुटुम्बियां तर्फे अभिवादन

क्रांतीकारक शाहिद भगतसिंग यांना करंदेकर कुटुम्बियां तर्फे अभिवादन

Published on

मुरुडमध्ये शहिदांना अनोखे अभिवादन
करंदेकर कुटुंबीयांतर्फे क्रांतिकारकांच्या शौर्यगाथेचे प्रदर्शन
मुरुड, ता. २३ (बातमीदार) ः ब्रिटीश सत्तेला सळो की पळो करून सोडणारे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतींना सोमवारी (ता. २३) मुरुडमध्ये अनोख्या पध्दतीने अभिवादन करण्यात आले आहे. यानिमित्ताने करंदेकर कुटुंबीयांनी क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित दुर्मिळ भिंतीपत्रकांचे प्रदर्शन आयोजित केले होते.
मुरुडमधील ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव मंडळाचे उपाध्यक्ष मोहन करंदेकर आणि प्रमोद करंदेकर यांच्या निवासस्थानी गेली ४४ वर्षांपासून शहिद दिनी दुर्मिळ प्रदर्शन भरविण्यात येते. भारतावर झालेल्या विविध परकीय आक्रमणांशी झुंज देणाऱ्या लढवय्या सेनानींची माहिती या प्रदर्शनाद्वारे देण्यात आली. युवा पिढीला या क्रांती सूर्यांचे सतत स्मरण राहावे आणि त्यांच्या बलिदानाची जाणीव व्हावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे करंदेकर यांनी सांगितले. याप्रसंगी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा समिती सभापती पी. के. आरेकर, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, समाजसेविका वासंती उमरोटकर, नगरसेवक नितीन अंबुर्ले, श्रीकांत खोत, मोहन करंदीकर, राष्ट्रपती पदक विजेते अजित कारभारी, मर्चंट पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप पाटील, जय श्रीराम पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रा. मेघराज जाधव, चिंतामणी मकू आदी मान्यवरांनी आदरांजली वाहून स्मृती जागवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com